धन-धान्य समृद्धीकारक विशेष सेवा (सेवा गुढीपाडव्याची)
चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) ही सेवा करायची असते.
आणि या दिवशी नाही जमल्यास कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करता येते.
घरामध्ये वर्षभर धन-धान्याची भरभराट राहावी, कशाचीही कमतरता भासू नये.
यासाठी वर्षारंभी ही सेवा केली जाते.
साहित्य :
तांब्याचा एक गोल कॉईन
तांब्याची छोटी पादुका
एक अखंड हळकुंड, रंगारी हिरडा,
जाड मीठ, थोडेसे नागकेशर,
सव्व्वा रुपया व घरातील एक मूठभर गहू
इत्यादी सर्व साहित्य पिवळ्या पिशवीमध्ये
देण्यात येत आहे.
पूजा पद्धती :
वरील साहित्याची पंचोपचार पूजा करावी,
त्यानंतर हे साहित्य पिवळ्या पिशवीत ठेवावे
ही पिशवी हातात घेऊन खालील प्रमाणे सेवा करावी
११ माळी श्री स्वामी समर्थ जप
११ वेळा कालभैरवाष्टक
त्यानंतर गुग्गुळाचा धूप देऊन
स्वयंपाकघर किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात हि पिशवी बांधावी.