Kalpvruksh [A Special Edition]

99.00

कल्पवृक्ष ( सेवामार्ग कार्य परिचय )

(सन २०२१-२०२२) सद्गुरू परमपूज्य मोरेदादा जन्मशताब्दी वर्ष निमित्त विशेष प्रस्तुती

कल्पवृक्ष  (संस्कारचित्रमाला – सेवामार्ग कार्य परिचय) :

 

दिंडोरी प्रणित या गुरूप्रणित सेवा मार्गाचे माझ्या मनातील स्थान आता अधिक भक्कम होणार !

सन २०२१ हे वर्ष अत्यंत महत्वाचे ठरणार आहे; की ज्यामध्ये विश्वातील तमाम जीव-सजीवांना कधी ना कधी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.  जसे की  …. दत्त महाराजांनी आपल्याला काय दिले ?  श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्याला काय दिले ? श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्याला काय दिले ? श्री स्वामींनी आपल्याला काय दिले ? मी ज्या गुरूप्रणित मार्गात सेवा करतो – तिथे नेमकं कसं काम चालतं ?

त्याचे उत्तर  . . .

दत्त महाराजांच्या प्रत्येक अवतारातील प्रसाद म्हणजे श्री पिठले महाराज होत ! तत्पश्चात तीच ऊर्जा, तीच तळमळ आणि तेवढीच स्वामीभक्ती म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा.

सद्गुरू दादांच्या महानिर्वाणानंतर परमपूज्य गुरुमाऊलींनी अहोरात्र  परिश्रमाने या स्वामी कार्याची सूर्यज्योत संपूर्ण जगात मानाने मिरवली. सद्गुरुंच्या याच महान अशा कार्याचा लेखा-जोखा म्हणजे “कल्पवृक्ष” ग्रंथ होय. स्वामी कार्यपासून अनभिद्न्य भाविकांसाठी सेवामार्ग कार्यपरीचय आणि उर्वरित भाविकांसाठी उजळणी. गुरुकार्याचा वसा घेणे व तेवढ्याच ताकतीने पूर्णत्वास नेणे, याचा आदर्श वस्तुपाठच आपल्या गुरूंनी आपल्या पुढे ठेवला आहे.

तेंव्हा आपण न चुकता “कल्पवृक्ष – सचित्र संस्कारमाला ” हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवणे, इतरांना घ्यायला सांगावा, आपल्या प्रियजनांना भेट द्यावा. असा ग्रंथ पुन्हा – पुन्हा तयार होत नसतो. संपल्यावर विचारणा करण्यापेक्षा आताच आपला ग्रंथ राखून ठेवा.

Weight 0.175 kg
Scroll to Top